आरोग्य क्षेत्रातील आश्चर्यकारक घटनेने परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. काशीनाथ कैलास पवार यांचे सहकारी परिचारिकेसोबत प्रेमसंबंध होते. यापूर्वीही या प्रकरणाची वाच्यता झाल्याने डॉक्टर व परिचारिकेची वेगवेगळ्या ठिकाणी बदली करण्यात आली होती.
पण पत्नी बाहेरगावी गेल्याची संधी साधून डॉक्टर पतीने प्रेयसी असलेल्या नर्सला घरात बोलावून चाळे सुरू केले. ही माहिती मिळताच पत्नीने घर गाठत दोघांनाही रंगेहाथ पकडून पोलिसांना माहिती दिल्याची घटना जिंतूर तालुक्यातील येलदरीत येथे घडली आहे.
डॉक्टरची पत्नी बाहेरगावी गेली होती, पत्नी बाहेरगावी गेल्यानंतर डॉक्टरने आपल्या प्रेयसी असलेल्या परिचारिकेला घरी बोलावले. त्यानंतर डॉक्टरच्या पत्नीला सदरील घटनेची खबर लागताच तिने लागलीच घर गाठून दोघांना रंगेहाथ पकडून पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी डॉक्टर पत्नीच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. 454, 498, 406, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरची जामिनावर मुक्तता करण्यात आली