आरक्षणाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पक्ष कटिबद्ध : राष्ट्रवादी

23

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेल्या ओबीसी आरक्षणावर न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यावर तीनही पक्षाच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

सध्या राजकीय आरक्षण संपत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्यात मंडल आयोगाची स्थापना त्यांनी केली होती. त्यामुळे ओबीसी समाजाचे सर्व आरक्षण अबाधित राहण्याची पक्षाची भूमिका आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

कालच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. याप्रमाणेच मराठा समाजातील गरीब वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी विधिमंडळात एकमताने कायदा पास करण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर यात निर्माण झालेल्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी पक्ष तसेच राज्य सरकार सकारात्मक असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. आरक्षणातील पदोन्नतीबाबत कुठल्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही यावर राज्य सरकारची चर्चा झाली आहे.