स्वॅब न घेताच रुग्ण पॉझीटीव्ह! बुलढाणा येथील अजब प्रकार

18

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा कोवीड सेंटरवर एक अजबच प्रकार समोर आला आहे. रुग्णाचा स्वॅब न घेताच संबंद्धित रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवला पॉझीटीव्ह आला. परिणामी बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या धक्कादायक प्रकाराची चर्चा होते आहे.

पंडीतराव देशमुख असे अहवाल पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णाचे नाव आहे. पंडीतराव देशमुख यांना तब्येतीत अस्वस्थता जाणवत असल्यामुळे २५ फेबृवारीला सकाळी त्यांनी मोताळा येथील सहकार नगर कोवीड सेंटरला गाठले. यावेळी दुपारी तुम्ही स्वॅब देण्याकरिता येण्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नं. घेण्यात आला. दुपारी काही कारणास्तव पंडीतराव देशमुख यांचे त्याठिकाणी जाणे झाले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा स्वॅब दिलाच नाही. परंतू तरिसुद्धा त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे त्यांना रुग्णालयाकडून कळवण्यात आले. अशी माहिती स्वत: पंडीतराव देशमुख यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.

संबंद्धित प्रकरणामुळे आरोग्ययंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दलबल तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी संबंद्धित प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगीतले आहे. तांत्रीक कारणामुळे हा गोंधळ झाला असल्याची शक्यतासुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.