ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होणार नाही; शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरचे उद्घाटन

7

सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्य शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी डॉ. संजय रोडगे यांच्या आजपर्यंतच्या सर्व कामाची स्तुती केली.

सध्या त्यानी जे त्यांनी काम हाती घेतले आहे त्यातून खरंच एक सामाजिक बांधिलकी दिसून येते. या शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय व जास्तीचा खर्च टाळण्यासाठी होणार आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्रानी तथा प्रमुख उपस्थिती म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर, आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

श्रीराम प्रतिष्ठानचे शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटर स्थापन करण्याचा उद्देश ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच रुग्णांना बेड व ऑक्सिजनची कमतरता भासू नये. आपण पहात आहोत कोरोणाने सर्व जग परेशान आहे कित्येक कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. रुग्णांना वेळेत उपचार मीळावा याकरिता दोनशे बेडचे व दहा ऑक्सिजन बेडची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ना नफा ना तोटा या उद्देशाने या कोरोना केअर सेंटरची उभारणी केल्याचे आपल्या प्रास्ताविकात डॉ. संजय रोडगे म्हणाले.