“पाटील म्हणजे आयत्या बिळावरील नागोबा” पाटलांवर पाटीलच संतापले

10

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापुर जिल्ह्यातले आहेत. परंतू गेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणुक लढले आणि विजयी झाले. या मद्द्यावरुनच चंद्रकांत पाटील यांच्यावर कायम टीका होत असते. या मुद्द्याला धरुनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील चंद्रकांत पाटलांवर बरसले आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे अायत्या बिळावरील नागोबा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पुजा चव्हान आत्महत्याप्रकरणी चौकशीची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच याप्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्याचे नाव समोर येत आहे. यावर शरद पवार गप्प बसणार असा सवाल चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांना केला होता. त्यावर शरद पवार यांनी ज्यांना स्वत:च गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागत अश्याबद्दल मी बोलायचं का? असा खोचक टोला पाटील यांना लगावला होता. त्यावर पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार मी काहीही बोललेलो नसतांना माझ्याबद्दल बोलतात अशी टीका केली. तसेच गोपीचंड पडळकर यांना समजूत देतांनासुद्धा त्यांनी पवारांवर टीका केली. यावर जयंत पाटील मात्र चांगलेच संतापले.

"मेधा कुळकर्णी यांनी विकासकामे करत आपला मतदारसंघ राखला होता. मात्र आपल्या पदाचा वापर करत कुळकर्णींना बाजूला सारत चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातून निवडणुक लढवली. हा कसला पुरुषार्थ? हे तर आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखे आहे. चंद्रकांत पाटील यांनी पवार साहेबांची मापं काढणं बंद कराव." असेसुद्धा जयंत पाटील यावेळी म्हणाले. "चंद्रकांत पाटील पुन्हा भाजपच सत्तेत येणार असे मोठ्या विश्वासाने सांगत असतात. एका प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांना स्वत:च्या जिल्ह्यात मतदारसंघ मिळू नये यावरुन त्यांच्या जिल्ह्यात त्यांची किती ताकद आहे हे सिद्ध होतं." असा टोलासुद्धा जयंत पाटील यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांना लगावला.

जयंत पाटील यांनी यावेळी इतरही मुद्द्यांना हात घातला. पुजा चव्हान अात्महत्या प्रकरणांत जर कुणी दोषी असेल तरच त्यावर कारवाई होईल असे पाटील म्हणाले. पडळकर यांच्या शरद पवारांवरील टीकेबाबत विचारले असता, एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन टीका केली जाते आहे. भाजपचे यांस अप्रत्यक्षरित्या समर्थनच आहे. ऐवढ्या खालच्या स्तरावर उतरुन भाजप राजकारण करु शकते यावरुन भाजपची पोहोच लक्षात येते” असे जयंत पाटील यावेळी बोलत होते.