पवारांची केलं ‘या’ राष्ट्रवादीच्या आमदाराचे कौतुक; ‘म्हणाले काही मदत लागली तर कळव’

28

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघातील भाळवणी गावात तब्बल ११,००० खाटांचे सुसज्ज शरदचंद्र पवार कोविड सेंटर उभारले आहे. सर्व रुग्णांची स्वतः आमदार निलेश लंके काळजी घेत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आमदार निलेश लंके यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

निलेश लंके हे कायमच आपल्या चांगल्या कामांसाठी चर्चेत असतात. मागच्या कोरोना लाटेमध्ये सुद्धा लंके यांनी कोविड सेंटर उभरल होतं. याही वेळी त्यांनी लोकसहभागातून हे सेंटर उभारल आहे. मतदारसंघ आणि जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होताना दिसतोय.

दरम्यान, ही माहिती  शरद पवार यांना मिळताच त्यांनी आज निलेश लंके यांना फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं. शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच निलेश लंके यांना फोन केला.

लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरची बातमी पाहून पवारांनी त्यांचं कौतुक केलं. तसेच ‘तू इतकं चांगलं कोविड सेंटर उभारलं मला कळालं, तू इतरांची काळजी घेतोय; मात्र स्वतःची पण काळजी घे. तुझ्या हातून अशीच सेवा घडत राहो, काही मदत लागल्यास कळव.’ अशी भावनिक सादही घातली.