जिथे सत्ता तिथे लोक जात असतात; आपल्याला असे लोक नकोत’ : जयंत पाटील

56

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रपूर शहरात आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी इतर पक्षातील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

“लोकांच्या मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम आहे. पक्षाने मोठ्या अपेक्षा ठेऊन आपल्याला पद दिलेलं असतं. त्याप्रमाणे आपण कामगिरी करायला हवी. पक्षाच्या विश्वासावर खरं ठरणं ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी नवीन कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ते म्हणाले की, “नुसती गर्दी करून उपयोग नाही, विचारांचा प्रचार करणारे लोक आपल्याला हवे आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे लोक कुणाचे होत नाहीत, जिथे सत्ता असेल तिथे ते लोक जात असतात, मात्र आपल्याला असे लोक नको आहेत.”

यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष राजीव कक्कड, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.