“येथील लोक बुद्धिमान असल्यामुळे ते भाजपला मतदान देत नाहीत” भाजप नेत्याचेच वक्तव्य

18

देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. भाजपने पाचही भरभक्कम यश मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. पं.बंगाल, आसाम आणि पड्डुचेरी या तीन राज्यांत भाजप सध्यातरी आघाडी घेणार असल्याचे चित्र आहे. मात्र केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपला तेवढे यश येईल असे चित्र नाही. यावरच केरळमधील भाजप नेत्याने भाजपचा चिंतेत पाडणारे वक्तव्य केले आहे.

केरळमधील लोक बुद्धिमान आणि सुशिक्षित आहेत. केरळ राज्यात साक्षरतेचा दर ९०% टक्के आहे. त्यामुळे येथील लोक कुठल्याही गोष्टीचा विचार तर्कसंगत पद्धतीने करतात. त्यामुळे केरळमध्ये भाजपला मतदान होण्याची शक्यता कमी आहे. असे खुद्द केरळमधील भाजपचे जेष्ठ नेते अो. राजगोपाल यांनी म्हटले आहे.

राजगोपाल यांच्या या विधानावरुन कॉंग्रेसने मात्र भाजपला टार्गेट केले आहे. राजगोपाल यांनी स्वत: कबुल केले आहे. केरळ आणि एकुणच दक्षिणमधील लोक बुद्धिमान आणि वैचारिक आहेत. त्यामुळे ते भाजपला मतदान करणार नाही हे खरे आहे. दक्षीणच नाही तर काही दिवसांनी भारतातसुद्धा भाजपला कुणी मतदान करणार नाही. अशी टीका कॉंग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केली आहे.