“प्लेगच्यावेळीचा रॅंडच्या अत्याचाराचा अनुभव राज्यातील जनता घेते आहे” मनसेची बोचरी टीका

12

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनची घोषना केली नसली, तरि कुठल्याही क्षणी लॉकडाऊन लागणार असा संकेत दिला आहे. विरोधी पक्षातील भाजपसह सत्ताधारी पक्षांनीसुद्धा लॉकडाऊनचा विरोध केला आहे. अशांतच मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊन संकेतावरुन मनसेने बोचरी टीका केली आहे.

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सध्याच्या कोरोना स्थितीची तुलना थेट प्लेग साथीशी केली आहे. प्लेग साथीदरम्यान ईंग्रज अधिकारी रॅंडने ज्याप्रमाणे सामान्य जनतेवर अन्याय केला तसाच अनुभव राज्यातील जनतेला सद्यस्थितीत येत असल्याचे संदिप देशपांडे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हला प्रत्युत्तर म्हणून संदिप देशपांडे यांनीसुद्धा फेसबुक लाईव्ह केले आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. लॉकडाऊनच्या काळात मनसैनिकांनी रस्त्यावर ऊतरुन काम केले आहे. शक्य तेवढ्यांना मदत केली आहे. मात्र सरकारने या काळात काय केले?

सरकारने जम्बो केअर सेंटर ऊभारुन अोळखींच्या काम देत फक्त स्वार्थ साधला आहे. अशी घणाघाती टीका संदिप देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान भाजपनेसुद्धा अनेक प्रश्न ऊपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.