आमदारांकडूनच कोव्हीड नियमावलींचे उल्लंघन..!

28

लासुर स्टेशन प्रतिनिधी संजय शर्मा

आमदारांकडून व जिल्हा बँकेकडून साथरोग प्रतिबंधक कायद्यासह कलम 144 चे उल्लंघन औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी सध्या निवडणुकीची लगीन घाई झाली असून अनेक आजी/माजी आमदार, पुढारी यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी कंबर कसली असून आज सर्वपक्षीय पुढाऱ्यासह शिवसेनेचे आमदार व जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे, माजी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार कैलास पाटील गंगापूरकर, माजी आमदार कल्याण पाटील काळे एक ना अनेक सर्व पक्षीय पुढारी यांनी आज औरंगाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी शहरात जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या कलम 144 चे उल्लंघन झाले नाही का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की आपल्याला कोरोला हरवायचे असेल तर मास्क ही ढाल तर सोसिएल डिस्टन्स म्हणजे तलवार आहे मात्र त्यांच्याच पक्षाच्या आजी माजी आमदार, कार्यकर्ते व महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार यांनी ना मास्क ना सेल्फ डिस्टन्स पाळले तर नाहीच वरून उपस्थित लोकांची संख्याही लक्षणीय होती मग ही चूक बँक प्रशासनाची की लोकप्रतिनिधींची?

मग जिल्हाधिकारी कलम 144 चे उल्लंघन केले म्हणून कायदेशीर कारवाई होईल का ?झालीच कारवाई तर बँक प्रशासनावर करणार की उपस्थित लोकप्रतिनिधींवर हा यक्षप्रश्न सामान्य लोकांसमोर पडला आहे.

प्रतिक्रिया:- महेश गुजर, (शेतकरी नेते) : सर्व सामान्य नागरिकांना मारहाण करणारे कोरोना योद्धा औरंगाबाद शहर पोलीस व प्रशासन कुठे आहेत? ते जिल्हा बँकेत काय तुमचे. (पाहुणे) जमा झाले की काय? असा सतंप्त प्रश्न उपस्थित केला आहे आज दि २२ रोजी औरंगाबाद जिल्हा बॅकेच्या परिसरात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आहवानाला हरताळ फासलेला दिसतोय. त्याठिकाणी उपस्थित असलेले लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणारे औरंगाबाद पोलीस बघ्याची भुमिका घेत होते की नेत्यांच्या दावणीला बांधलेले होते? शिवजयंतीला कडक निर्बंध लावुन सर्वसामान्य नागरिकांना च्या उत्साहवर निर्बंध लादणारे पोलीस आता नियम बनवणार्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतील का?