प्रति देहू डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा साधेपणात साजरा

6

आज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम महाराज बीज उत्सव आहे. हा सोहळा बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

मात्र प्रति देहु समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळासाधेपणाने आणि नियमांचे काटेकोर पालन करीत साजरा करण्यात आला आहे. डोर्लेवाडी येथे गेली 63 वर्षापासून हा उत्सव सोहळा साजरा केला जात आहे. यंदा या बीज उत्सव सोहळ्याचे 64 वे वर्ष आहे.