कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता वाशिम जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण वर्ग तसेच खाजगी शिकवणी वर्गांवर निर्बंध आणण्यात आले होते. मात्र आता यामध्ये काहीप्रमाण शिथीलता देण्यात आली असून खाजगी शिकवणी वर्ग व प्रशिक्षण वर्ग यांना काही नियमांसह करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी तसे आदेश दिले आहेत.
फेबृवारीच्या सरतेशेवटी कोरोना विषाणुने वाशिम जिल्ह्यात वेगाने आपले पाय रोवण्यास सुरुवात केली होती. परिणामी जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले होते. यातच खाजगी शिकवणीवर्ग तसेच तसेच प्रशिक्षण केंद्रे बंद करण्यात आले होते. मात्र आता शिकवणी वर्गांना कोरोना नियमावलीचे पालन करीत २५ टक्के ऊपस्थितीने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऊघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये कोचींग क्लासेस, संगणक प्रशिक्षण संस्था, टंकलेखन प्रशिक्षण संस्था व ईतरही प्रशिक्षण देणार्या संस्थांचा समावेश आहे. सर्व नियमांचे पालन करुन २५ टक्के ऊपस्थितीसह परवानगी देण्यात आली आहे.
कुठल्याही प्रकारे नियमांचे ऊल्लंघन झाल्यास संबंद्धित संस्थेवर कठोर कारवाई करावी असे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने स्थानिक प्रशासनास दिले आहे.