मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमंतीत सातत्याने वाढ होते आहे. यासोबतच घरगुती गॅसच्या किंमतीतसुद्धा दरवाढ होत आहे. परिणामी सामान्यांच्या खिशा वेगाने रिकामा होत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन राजकारणसुद्धा चांगलेच तापले होते. महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी कॉंग्रेसच्या आमदारांनी सायकलने विधानभवनात पोहचय ईंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. मात्र आता ही दरवाढ स्थिर होण्याची चीन्हे आहेत. पेट्रोलियम कंपन्या दर स्थिर ठेवण्याच्या विचाराधीन आहे.
सलग तीन दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहे. याअगोदर राविवारी(दि.२८ फेबृ) आणि सोमवारी(दि.१ मार्च) दर स्थिर ठेवण्यात आले होते. तीन दिवस दर स्थिर ठेवल्याने देशातील विवध भागात पेट्रोलच्या किमंतीमध्ये फरक पडला आहे. यामुळे ग्राहकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.
शनिवारी(दि.२७ फेबृ) पेट्रोलचे दर २४ पैसे तर डिझेलचे दर १ पैश्यांनी वाढले होते. जागतिक बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत असल्यामुळे कंपन्यांना तेल आयात करणे खर्चिक होते आहे. दरम्यान,इंधन दर स्थिर असल्याने आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१९ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे.
नुकतेच अमेरिकेने १.९ लाख कोटी डॉलर्सला मंजुरी दिल्यामुळे पुन्हा जागतिक बाजारातील तेलाच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र भारतीय कंपन्यांचा भाव स्थिर ठेवण्यावा मानस दिसतो आहे. जर भारतीय कंपन्यांनी दर स्थिर ठेवले, तर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.