महाराष्ट्रात पेट्रोल नव्वदी पार; प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेल भाव ‘इथे’ पहा

16

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलच्या भावात 28 पैसे तर डिझेलच्या भावा 30 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यात आणि देशातही पेट्रोलचे भाव नव्वदी तर डिझेलचे दर ऐंशी पार गेले आहेत. त्याचा फटका वाहनधारकांना बसताना पाहायला मिळतोय.

अनेक देशांनी जानेवारीपासून उत्पादनात 5 लाख बॅरलची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात भाव ( लिटरमध्ये ) खालीलप्रमाणे :

पेट्रोल
मुंबई : 90.05
ठाणे: 90.39
पुणे : 90
नाशिक : 90.76
औरंगाबाद : 91.53
बीड : 91.36
नागपूर : 90.18
रत्नागिरी : 91.72
जळगाव : 91.52
अमरावती: 91.73
चंद्रपूर : 90.28
वर्धा : 90.79
कोल्हापूर: 90.58
लातूर: 91.39
नांदेड: 92.53

डिझेल
मुंबई : 80.23
ठाणे: 80.56
पुणे : 78.97
नाशिक : 79.71
औरंगाबाद : 81.71
बीड : 80.3
नागपूर : 79.18
रत्नागिरी : 80.66
जळगाव : 80.44
अमरावती: 81.93
चंद्रपूर : 79.29
वर्धा : 79.77
कोल्हापूर: 79.56
लातूर: 80.33
नांदेड: 81.43