अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने भारत सरकारला ऑफर देऊ केली आहे. भारतातील कोरोना लसीकरण्याच्या व्यापक मोहिमेसाठी कोणताही आर्थिक नफा न कमावता लसींचा पुरवठा करण्याची तयारी फायझरने दर्शवली आहे.
फायझर कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासंबंधी कंपनीची काही वेगळी धोरणे असून, त्याच्या आधारे ना नफा किमतीमध्ये काही देशांना कोरोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत.
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी फायझर कंपनी ‘ना नफा’ किमतीमध्ये लस देण्यास तयार आहे. त्यासंबंधी आम्ही भारत सरकारच्या सातत्याने संपर्कात असून, आमची चर्चा सुरू आहे, असे कंपनीने म्हटले आहे.