पोलिस कंट्रोल रुमच्या 112 व्हॉट्सऍप नंबरवर शनिवारी रात्री 8 वाजून 7 मिनिटाला एका मोबाईल नंबरवरुन मेसेज आला. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धकमी देण्यात आली आहे.याप्रकरणी रविवारी सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
धमकीचा मेसेज आल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तसेच सर्वेलन्सच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात आहे.डीसीपी साऊथ रवी कुमार यांच्यानुसार आतापर्यंतच्या तपासात कळतंय की धमकी देणारा व्यक्ती दुसऱ्या शहरातील आहे. मेसेज पाठवण्यात आलेल्या मोबाईल नंबरविषयी पूर्ण माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले. पण, धमकी देणाऱ्याला लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत. अनेकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. योगी आदित्यनाथ दहशतवाद्यांचे हिट लिस्टवर आहेत.”योगी आदित्यनाथ यांची 24 तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके 47 ने 24 तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन”.असे त्या मेसेज मध्ये म्हटले आहे.