मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ‘स्वप्नील जोशी’ नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच तो नवीन ऍक्टिव्हीटि करत असतो. स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमी असतो. त्याचे फॅन फॉल्लोविंग देखील जास्त आहेत. काही काळापूर्वी ‘तेरे घरच्या समोर’ या मालिकेत स्वप्निल जोशी एका वेगळ्या रुपात दिसला होता.
या मालिकेत स्वप्नीलने स्त्री पात्र साकारले होते. या भूमिकेची आठवण त्याने एक फोटो शेअर करत केली आहे. स्वप्नील जोशीने शेअर केलेला त्याचा हा लूक अनेकांना प्रेमात पडणारा असून, अवघ्या काही तासांतच त्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये स्वप्निल स्त्री वेशात असून त्याने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. आता हा स्त्री वेश कशासाठी तर ‘तेरे घरच्या समोर’च्या आठवणीत.
स्वप्नीलने फोटो शेअर करत कॅपशन देखील दिले आहे, ‘तेरे घरच्या समोर’ ही मालिका करत असताना मोठ्या कलाकारांकडून भरपूर शिकता आले. हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला आहे. स्त्री भूमिका साकारणे अजीबात सोपे नाही. ‘ती’ जखमांच गोंदण मिरवणारी सक्षम सखी आहे. जी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे. अशा प्रत्येक ‘ती’च स्वप्न पूर्ण करायला shop with ti तयार आहे.’