परीक्षेच्या प्रवेश पत्रावर सनी लिओनी आणि इमरान हाश्मीचा फोटो व्हायरल

10

परिक्षेच्या अॅडमिट कार्डावर सनी लिओनी आणि इमरान हाश्मीचा फोटो आणि नाव व्हायरल
झाला आहे.भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठानं केलेल्या तपासातून ही बाब समोर आली आहे. ज्याच्याकडून ही चूक झाली आहे. त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बी. ए च्या दुस-या वर्षाला शिकणा-या त्या विद्यार्थ्यानं जे प्रवेशपत्र सोशल मीडियावर शेयर केलं आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला त्याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे. परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे नाव कुंदन कुमार असून तो धनराज महंतो डिग्री महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे कळते आहे. प्रवेश पत्रावरील वडिलांच्या नावाच्या कॉलममध्ये वडिलांच्या जागी इमरान हाश्मीचं नाव आले आहे. यामुळे ते प्रवेशपत्र चर्चेत आहे.

इमरान हाश्मी आणि सनी लिओनी हे उत्तर बिहारचे रहिवासी असून ते अविवाहीत असल्याचे म्हटले आहे. वीस वर्षीय त्या विद्यार्थ्याच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.चौकशीच्या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव राम कृष्ण ठाकूर यांनी सांगितले.