सौदी अरेबियाची पीआयएफ कंपनी करणार रिलायन्स रिटेलमध्ये 9555 कोटींची गुंतवणूक

3

लॉकडाउन दरम्यान रिलायन्स कंपनीने गुंतवणूक मिळवण्यासंबंधीत प्रयत्न सुरू होते. ते अजूनही कायम आहेत. पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड 1.3 बिलियन डॉलर अर्थात 9,555 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी जाहीर केले. 2.04 टक्के भागभांडवलासाठी PIF ने गुंतवणूक केली आहे. सौदमध्ये रिलायन्स रिटेलची प्री-मनी इक्विटीची किंमत 4.587 लाख कोटी रुपये आहे. प्री-मनी इक्विटी गुंतवणूकीपेक्षा सुमारे 30 हजार कोटी अधिक आहे. सौदी अरेबियाची गुंतवणूक कंपनी PIF ने रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्याची देखील घोषणा केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सौदयाबाबत आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, “सौदी अरेबियाबरोबर आमचा दीर्घकाळ संबंध आहे. पीआयएफ सौदी अरेबियाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. रिलायन्स रिटेलमध्ये मी एक महत्त्वाचा भागीदार आहे. पीआयएफ म्हणून आम्ही 130 कोटी भारतीय आणि कोट्यावधी लघु व्यापाऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यास व किरकोळ क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा महत्वकांक्षी योजनेला पीआयएफच्या सतत पाठिंब्याची अपेक्षा आहे.”