कोविड 19 च्या संकटाशी लढण्यासाठी प्लाझ्मा हे प्रमुख शस्त्र आहे.मात्र काही ठिकाणी प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात. त्यामुळे ‘माझे आपणास आवाहन आहे की, आपणास शक्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कृपया आपण प्लाझ्मा दान करावे.असेही त्यांनी सांगितले आहे.
प्लाझ्मा दान करून कोरोनाग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे.सॅनिटायझरचा वापर
करावा. अगदी खुप गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करतच घराबाहेर पडावे. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.