कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पीएमपी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीने 114 बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या बसधून प्रवास करता येणार आहे. ही बस सेवा सकाळी 6 ते रात्री 8.30 पर्यंत सुरु राहणार आहे.
पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना या बसमधून प्रवास करता येईल. बसमधून प्रवास करताना प्रवाशांना शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
पीएमपीच्या बसेस स्वारगेट, नरवीर तानाजी वाडी, कोथरुड, कात्रज, हडपसर, निगडी, भोसरी, पिंपीर इत्यादी आगारातून ही बस दर अर्धा ते एक तासाल सोडण्यात येईल. त्यासाठी 57 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
बसमधू प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल, अशी माहिती डॉ.पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.