केवळ कुहेतूने पोलिस कारवाई करीत आहेत : रिपब्लिककडून दावा

17

बनावट टीआरपी प्रकरणात एआरजी आऊटलिअर यांच्या वतीने मंगळवारी पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यात पोलीस एआरजीविरोधात नाहक कारवाई करीत आहेत, त्यांना आमच्याविरोधात पुरावा मिळण्यात अपयश आले आहे.असा दावा रिपब्लिककडून करण्यात आला आहे.

रिपब्लिक टीव्ही आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, केवळ कुहेतूने पोलिस कारवाई करीत आहेत, असा दावा रिपब्लिककडून करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक अडकवले आणि अटक केली, असेही यात म्हटले आहे.

त्यांना आमच्याविरोधात पुरावा मिळण्यात अपयश आले आहे. केवळ पालघर साधु हत्येचे वार्तांकन केले म्हणून पोलीस आकस ठेवला जात आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे.