पोलिसांच्या छाप्यात सुरेश रैनाला अटक

28

मुंबई विमानतळाजवळील मुंबई ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर क्रिकेटपटू सुरेश रैनाला अटक करण्यात आल्याचे समजते.विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी ३४ जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. 

आयपीसीच्या कलम १८८, २६९, ३४ आणि एनएमडीएच्या काही कलमांतर्गत पोलिसांनी एकूण ३४ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई केली गेली आहे.

सहार पोलीस स्टेशनचे सिनीयर पीआय म्हणाले, गुरु रंधावा व क्रिकेटर सुरेश रैना हे त्या लोकांमध्ये आहेत, ज्यांना आम्ही ताब्यात घेतले होते.