पोलिस हे सामान्य जनतेचे सेवक असतात. सर्वसामान्यांची सुरक्षा करणे ही पोलिसांची जवाबदारी असते. असे आपण ऐकत असतो. परंतू अलिकडे तक्रार दाखल केल्यानंतर न्यायासाठी विलंब होत असल्याचे प्रकार घडतायत. तसेच पोलिसांबद्दल अनुग्रह करुन काही लोक पोलिस स्टेशनला जाण्यासच घाबरतात. तर काही पोलिसांच्या नावे बोटं मोडून मोकळी होतात. परिणामी पोलिस आणि सामान्य जनता यांच्यामध्ये दरी निर्माण होत असल्याची स्थिती आहे. ही दरी कमी करण्यासाठी भिवंडी पोलिसांनी एक नविन ऊपक्रम राबवला आहे. ज्याचे नाव “पोलिस आपल्या दारी, संरक्षण आमची जवाबदारी” असे नाव आहे.
या ऊपक्रमाअंतर्गत पोलिस थेट तक्रारदारांच्या मोहल्ल्यात जाऊन एखाद्या सभागृहात किंवा विशीष्ट ठिकाणी तक्रारदारांना बोलावते जाते आणि बैठक घेतली जाते. त्याठिकाणीच तक्रारदाराची तक्रार ऐकुण जागीच पोलिसांकडून त्या तक्रारीचा निपटारा लावला जातो. या बैठकीस वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक, ऊपनिरीक्षक हे ऊपस्थित असतात. यामुळे नागरिकांना पोलिस स्टेशनला माराव्या लागणार्या चक्रा, तसेच घ्यावा लागणार नाहक त्रास यांपासून नागरिकांना दिलासा मिळतो आहे. परिणामी पोलिसांच्या या नविन ऊपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होते आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. यामध्ये नारपोली, भिवंडी शहर, शांतीनगर, भोईवाडा, निजामपुरा आणि कोनगाव या सहा पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्या परिसरात हा ऊपक्रम राबवण्यात येत आहे.
तक्रारींचा निपटारा करण्यासोबतच पोलिस विविध विषयांना घेऊन लोकांमध्ये जनजागृतीसुद्धा करतात. यामध्ये शिक्षणाचे महत्व, मुलींवर होणारे वाढते अत्याचार, कोरोनाचे नियम पाळण्याबाबत जनजागृती याचा समावेश आहे. या ऊपक्रमाचा मुख्य उद्देश तक्रारींचे निरसन करणे आहे. तसेच या ऊपक्रमाअंतर्गत आम्हाला थेट जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेता येत आहे. नागरिकांचासुद्धा यास ऊत्तम प्रतिसाद असल्याचे भिवंडी पोलिस ऊपायुक्त योगेश चव्हान यांनी यावेळी सांगीतले.