पोलिसांच्या छाप्यात तब्बल तब्बल ‘इतक्या’ रुपयांची दारू जप्त

13

परभणी जिल्ह्यातील बोरगाव (ता.सेलू) येथील शेती आखाड्यावर सेलू पोलिसांनी धाड टाकून 45 हजार रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई काल मध्यरात्री केली. सदरील कारवाईत मोठा दरुसाठा जप्त करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोवर्धनदास भुमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजयकुमार पांडे, कर्मचारी सुनील वासलवार, बाळू पुरनवाड, रामेश्वर मुंडे, सय्यद रहीम आदींनी मिळालेल्या माहितीरून सातोना रस्त्यावरील बोरगाव शिवारातील शेत आखाड्यावर छापा मारला.

त्यावेळी तेथे पत्राच्या शेडमध्ये भुश्याखाली लपवून ठेवलेली दारू जप्त केली. त्यात दारूचे 18 ब़ॉक्स ज्याची किंमत 44 हजार 928 रुपये तसेच एक मोटारसायकलही जप्त केली. असा एकूण 65 हजार 928 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस चोरट्या मार्गाने दारूच्या विक्रीच्या घटना वाढल्या आहेत.