पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप,भाजपचे ३३ आमदार तृणमुल काँग्रेसमध्ये जाणार?

27

तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाजपचा दारुण पराभव केला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी अनेक तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यातील अनेकांचा भाजपमध्ये अपेक्षाभंग झाला आहे. त्यातील अनेक नेत्यांना आता घरवापसीचे वेध लागले आहेत.

बंगालमध्ये भाजपचे तब्‍बल ३३ आमदार तृणमूल काँग्रेसच्या मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. पुरवू तृणमुलमध्ये असलेल्या या ३३ आमदारांनी भाजपमध्ये जात निवडणूक लढवली होती. आता त्यांना परत तृणमूल मध्ये जायचे आहे. अशी माहिती आहे.

हे आमदार खरंच पुन्हा तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सोबतच भाजपचे राष्‍ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांचे पुत्र सुभ्रांशु हे देखील तृणमुलमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आहेत. मात्र, यावर भाजप प्रवक्‍ते शमिक भट्टाचार्य यांनी ही अफवा असल्‍याचे म्‍हटले आहे.