लसीकरणावरुन राजकारण, केंद्र विरुद्ध राज्य अशी स्थिती

5

देशात कोरोनाचा कहर कायम आहे. या लसीकरणावर भर देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र आता लसीकरणावरुनच जोरदार राजकारण तापते आहे. लसीकरणावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात लसींचा तुटवडा जाणवतो आहे. केंद्र सरकारकडून लस पुरवण्यात दुजाभाव केला जात असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांसमोर म्हटले आहे. यावर केंद्रिय अ‍रोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन राज्याला सुरळीतपणे लसीकरण होते आहे असे स्पष्टीकरण दिले. तसेच देशाच्या कोरोना विरुद्धच्या लढाईल महाराष्ट्र सरकारने सुरुंग लावल्याचा गंभीर आरोप केला आहे.

केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांना शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी ऊत्तर दिले आहे. महाराष्ट्र स्वत:चे अपयश कधीच झाकत नाही असे ते म्हणाले. सोबतच महाराष्ट्राका कमी लेखण्याचा, बदनाम करण्याचा प्रकार सुरु आहे. डॉ.हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे टीकाटीपन्नी करण्यापेक्षा जनतेची सेवा केली पाहिजे असेसुद्धा संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान आता लसीकरणावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजेश टोपे यांच्यावर महाराष्ट्रातील भाजपनेसुद्धा कडाडून टीका केली आहे.