लसीकरणावरुन तापलं राजकारण! फडणवीसांनी आरोग्यमंत्र्यांना सुनावले खडे बोल

21

संपूर्ण देशात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र राज्यात लसीकरणावरुन आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात केवळ तीन दिवस पुरेल ऐवढेच साठा शिल्लक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रासारमाध्यमांशी बोलतांना सांगीतले. यावरुनच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजेश टोपे चुकीची माहिती सांगत असल्याचे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

केंद्रामडून लसींचा पुरवठा होतो आहे. मात्र त्यामध्ये वेग कमी आहे. असव विधानसुद्धा राजेश टोपे यांनी यावेळी केले. देवेंद्र फडणवीस यांनी यांस प्रत्युत्तर दिले आहे. लसीकरणासंदर्भात राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात येणारे आरोप चुकीचे अाहेत. मंत्री चुकीची माहिती देत आहे. असे फडणवीस म्हणाले आहेत.

“केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधीक लसी दिल्या जात आहे. भारत सरकार काही वेगळं आहे का? आणि असे विषय राज्त सरकारमधील मत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलले पाहिजे. माध्यमांशी नाही” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. अशी टीकासुद्धा फडणवीस यांनी यावेळी केली आहे.