अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे या दोघांना गुरुवारी गोवा पोलिसांनी अटक केली होती. चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीत करण्याच्या आरोपावरून कॅनकोना येथून दोघांना अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणात दोघांनाही जामीन मिळाला आहे. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना कॅनकोना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने गुरुवारी रात्री नऊ वाजता जामीन मंजूर केला आहे. ‘जामीन मिळाला असला तरी, पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे पोलिसांच्या परवानगीशिवाय गोवा सोडू शकत नाहीत. दोघांनाही पुढचे सहा दिवस पोलीस ठाण्यात येऊन दररोज हजेरी लावावी लागणार आहे.
गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने पूनम पांडे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या एफआयआरमुळे पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली होती.