देशभर विशेषतः राज्यभर मागच्या वर्षभरापासून कोरोना महामारीने लोकं हैराण झाले आहेत. मागचा महिनाभाराप्सून तर कोरोनामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अनेक लोकं रुग्णालयात आहेत. अनेक आपापल्या घरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. चीहीकडे निराशच निराशा पसरली आहे. चांगल धडधाकट व्यक्तीही कोरोनाच्या नकारात्मक भीतीमुळे त्रासला आहे.
सरकार, प्रशासन व आरोग्य यंत्राणा या जीवघेण्या परिस्थितीतून सर्वांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यातूनच एखादि सकारात्मक घटना सर्वांना सुखद अनुभव मिळत आहे. अशीच एक या कोरोनाच्या कठीण काळात आशादायी घटना घडली आहे ती म्हणजे लातूर ग्रामीण भागातील कृष्णानगर अर्थात काटगाव तांड्यातील १०५ वर्षाचे धेनु उमाजी चव्हाण व ९५ वर्षाच्या मोताबाई चव्हाण या वृद्ध दाम्पत्याने वेळेवर निदान व उपचार करत कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
लातूर येथील स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वरील दांपत्यावर उपचार करण्यात आले व त्यांना पूर्णपणे बरे आले आहे. याबद्दल लातूर ग्रामीण चे आमदार धीरज देशमुख यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. व सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.