‘सत्ता येणार असे वारंवार सांगतात; पण भविष्यवाणी सत्य होत नसल्याने ते हताश’

34

भारतीय जनता पार्टीचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्याने ते हताश झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम हे नेते राबवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही परतू नयेत या भीतीमुळे राज्यात लवकरच सत्ता येणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत.

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस अशा अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देऊन राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली असल्याने जनता संतुष्ट असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

त्यामुळे सत्ता येणार, सत्ता येणार असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.