सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आहे. नुकतीच त्याने त्याच्या आगामी सिनेमाची घोषण केली आहे. या सिनेमाचं नाव ‘सलार’ आहे. आदिपुरुष, राधे श्याम आणि दीपिका पादुकोणबरोबरच्या सायन्स फिक्शन चित्रपटानंतर आता प्रभासने दिग्दर्शक प्रशांत नील यांचा पुढील चित्रपट साइन केला आहे.
प्रशांत नीलने नुकतीच हैदराबादमध्ये प्रभासची भेट घेतल्याचे समजले आहे. त्यानंतर प्रभासने चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर हा चित्रपट करणार आहे. या चित्रपटातील पहिला लूक प्रभासने सोशल मीडियावर शेअर केला आहे, चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे. या पोस्टरमध्ये प्रभास हा गन घेऊन बसल्याचा दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या या सिनेमाचे प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. हा एक अॅक्शन सिनेमा आहे.
प्रभासचा या चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर शेअर झाला आहे. तो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वांत जास्त हिंसक एका व्यक्तीला सर्वांत जास्त हिंसक म्हणतात’. प्रशांत नीलने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये प्रभाससोबत कोण स्क्रीन शेअर करणार याची माहिती अजून मिळाली नाही, परंतु हा सिनेमा भारतातील 5 भाषांमध्ये रिलीज केला जाईल ही माहिती मिळत आहे.