दिग्दर्शक, अभिनेता आणि प्रसिध्द डान्स कोरियोग्राफर प्रभुदेवा सध्या खूप चर्चेत आहे. प्रभुदेवाला भारताचा ‘मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखले जाते. प्रभुदेवा लवकरचं दुसरं लग्न करणार आहे अशी तुफान चर्चा सुरू आहे. काही वर्षापूर्वी प्रभुदेवा यांनी पत्नी रामलता यांना घटस्फोट दिला होता. दोघांमध्ये अनेक वर्षे मतभेद सुरू होते.
नवभारत टाईम वृत्तांच्या माहितीनुसार, पुन्हा लग्न करणार आहेत. प्रभुदेवा यांचे त्यांच्या भाचीसोबत संबंध असल्याच्या बातम्या पसरत आहेत. ते त्यांच्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरचं ते तिच्यासोबत लग्न करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व चर्चेवर प्रभूदेवानी काहीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पहिल्या घटस्फोटानंतर त्याच्या नयनतारा सोबत अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. आणि ते लग्न करतील अशाही चर्चा समोर आल्या होत्या. परंतु नयनताराने लग्नास नकार दिला होता.
प्रभु देवाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या ते सलमान खानच्या ‘राधे: मोस्ट वाँण्टेड भाई’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ते एका तामिळ सिनेमात मुख्य भूमिकेत देखील दिसणार आहेत. त्यासोबत ‘यंग मुंग सुंग’ आणि ‘बघिरा’ या सिनेमांमध्ये तो काम देखील करत आहे. ‘पोन मनिकवेल’ हा प्रभूदेवा यांच्या 50 वा सिनेमा असणार आहे. या सिनेमात तो पहिल्यांदाचं पोलिसांच्या भूमिकेत दिसेल.