राज्यसभेचे माजी खासदार आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी अझाद यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. जम्मुमध्ये हा प्रकार घडला असून ऊपस्थिय कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याचे दहनसुद्धा केले आहे. गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याच्या संतापातून कार्यकर्त्यांनी हे पाऊल ऊचलले गेल्याचे सांगीतले जात आहे.
नुकतेच गुलाम नबी आझाद राज्यसभेच्या खासदारपदावरुन निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारोहावेळी पंतप्रधान मोदींना सभागृहात अश्रू अनावर झाले होते. गुलाम नबी आझाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय शत्रू असले तरी वैयक्तिक आयुष्यात ते चांगले मित्र आहेत. काही दिवसांअगोदर जम्मूत आझाद यांच्या नेतृत्वाखाली जी-२३ परिषदेची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीवेळी आझाद यांनी मोदींचे कौतुक केले होते. यावरच कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेत आझाद पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
“आपल्या मुळाचा गर्व असलेल्या, चहा विक्रेत्याच्या आपल्या भूतकाळाबद्दल खुलेपणानं स्वीकारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नेते आपल्याला भावले आहे” असे कौतुकास्पद ऊद्गार आझाद यांनी मोदींविषयी काढले होते. तसेच कॉंग्रेसचे नेतृत्व आणि भविष्याबद्दल प्रश्नसुद्धा ऊपस्थित केले होते. मात्र कॉंग्रेसच्या जम्मूतील काही नेत्यांनी यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.
तामिळनाडूच्या खासदार ज्योतिमनी यांनीसुद्धा गुलाम नबी आझाद यांना खडेबोल सुनावले आहे. आझादजी आपण ज्यांचे कौतुक करताय, त्यांनीच काश्मिरला तुकड्यांत विभागले आहे. आपण आज जे काही आहात ते या काश्मिरींमुळेच आहात हे आपण लक्षात घ्यावे असेसुद्धा त्यांनी म्हटले आहे.