देशभरात कोरोनाचे मोठे संकट निर्माण झालेलं आहे. केंद्रातील मोदी सरकार कोरोना उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचे आरोप विरोधी पक्ष करत आहेत. त्यामूळे केंद्रातील सरकार मोठे अडचणीत सापडले असल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच राज्यातील सरकारवर भाजप नेते कडाडून टीका करताना पाहायला मिळतंय.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं. त्यांनी नागपुरात चार-पाच कोविड सेंटर उभारावेत,’ असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे त्यांनी, ‘दुसऱ्या लाटेचं अपयश हे फक्त मोदींचा ममतांना पराभूत करण्याच्या अट्टहासामुळे,’ असल्याची टीका देखील केली.