भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक विजय स्तंभास प्रकाश आंबेडकरांची मानवंदना

23

आज सकाळी 7 वा. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली. जानेवारी 1818 रोजी या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती. यामध्ये 500 महार सैनिकांनी 28 हजार पेशवांचा पराभव केला होता. या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ या विजय स्तंभाचे निर्माण ब्रिटिशांनी केले होते.

दरवर्षी देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदर व्यक्त केला आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, अशोक सोनोने, वंचितचे प्रवक्ते, अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक आणि प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.