प्रकाश आंबेडकर यांचा लसीकरण मोहिमेबद्दल सरकारला सवाल : म्हणाले ‘त्या’ दोघांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन

28

भारतात जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू झालं आहे. कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आलीकोरोना संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांना कोरोना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. 

मोदींच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात लसीकरण अभियानाचा शुभारंभ झाला. मात्र या लसीकरण मोहिमेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लसीकरण मोहिमेबद्दल सवाल विचारले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांना मोफत मिळणार का, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना लस मोफत मिळणार की नाही, याबद्दलचा निर्णय अद्याप केंद्र सरकारनं घेतलेला नाही. केंद्रानं यासंदर्भातला निर्णय घेतला की मग आम्ही निर्णय घेऊ, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.