कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यास दि. १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. मागील काही कळाता लोकप्रतिनिधी आणि आपल्या देशातील प्रतिष्ठितांनी कोरोनाची लस घेत जनतेस लस घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्येच कारंजा-मानोरा मतदारसंघाचे माजी आ. प्रकाश डहाके यांनीसुद्धा आज(दि ४ मार्च) लस घेतली आहेे. तसेच ६० वर्षांवरील आणि लस घेण्यास पात्र असणार्या कारंजावासियांना लस घेण्याचे आवाहनसुद्धा केले आहे.
दि. १ मार्चपासून लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यास संपूर्ण देशात सुरुवात झाली आहे. यामध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती तसेच ईतर काही आजार असणारे ४५ वर्षावरील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. कारंजातील ऊपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची मोहीम सुरु आहे. मात्र अजूनही लसीबाबत काही अफवा समाजात पसरत असल्यामुळे बहूतेक व्यक्तींनी लस घेतलेली नाही. त्यामुळे प्रकाश डहाके यांनी स्वत: पुढाकर घेत लस घेतली आणि या अफवांना बळी न पडता अधिकाधिक लोकांनी ही लस घ्यावी असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले.
यावेळी कारंजा ऊपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. साळुंके, कारंजा कोवीड सेंटरचे नोडल अॉफीसर डॉ. अविष दरेकार तसेच अधिपरिचारक सावन कोल्हे आणि सेवा देणार्या रुग्णालयातील सर्व परिचारिका ऊपस्थित होत्या.