राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजत, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारीला मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पैशांचा मोठा सुळसुळाट ग्रामपंचायत पाहायला मिळतो. त्यातून दारू, मटण अशी मतदारांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींचं वाटप मोठ्या प्रमाणात होतं. गावात अनेक वाद उद्भवत असतात.
यावर महाराष्ट्रातील एका आमदाराने नामी उपाय शोधत गावकऱ्यांना मोठी ऑफर दिली आहे. गावची ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रशासनावर मोठा ताण पडतो. तसेच निवडणुकीला मोठा खर्च होतो. याला आळा बसवण्यासाठी बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे असल्याचे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. गावचा संघर्ष यामुळे कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले.
दरम्यान, दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याची दिलेले प्रलोभन योग्य नाही, अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास हा निधी आणणार कोठून, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदार लंके यांना टोला लगावला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर हा मोठा निधी आमदार लंके कोणत्या निधीतून देणार. निधी देण्यावरही अनेक बंधने आहेत. असे असताना लंके यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाही, असं प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे.