अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न, देऊळ बंद अशा चित्रपटानंतर एका नव्या विषयाला हात घालणार आहे. तरडेंच्या नवीन चित्रपटाचं नाव ‘कोल्हापूर टु बुलडाणा व्हाया इस्त्राईल’ असे असून ही एक लव्हस्टोरी आहे. नुकतीच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रवीण तरडेंचा मुळशी पॅटर्न प्रचंड गाजला होता. प्रवीण तरडे सध्या ‘सर सेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.
प्रवीण तरडे आगामी चित्रपटाबद्दल माहिती देताना, “मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये एक लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. परंतु ही प्रेमकथा सामान्य प्रेमकथेसारखी नाही. माझे चित्रपट शेतकऱ्यांशी आणि सामाजिक विषयांशी जोडलेले असतात. प्रेमकथेत देखील हे मुद्दे असतील. माझ्या नव्या चित्रपटाचे नाव ‘कोल्हापूर टु बुलडाणा व्हाया ईस्त्राईल’ आहे.
ईस्त्राईल मध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही, तरीही त्यांनी शेतीमध्ये बराच विकास केला आहे. माझ्या कथेतील पात्र याचं विषयांवर अभ्यास करताना दिसतील. आणि यामधून एक छान प्रेमकथा तुमच्या भेटीस येईल. अशी माहिती पुढे बोलताना प्रवीण तरडे यांनी दिली.