इंदापूर तालुक्यामध्ये तिसऱ्या लाटेच्या संदर्भात योग्य उपचार बालकांना मिळतील. शासनाच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी करीत आहोत, अशी माहिती बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
जी तिसरी लाट येणार आहे. या संदर्भात वय अठरा वर्षांच्या खालील मुलांना, तसेच लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता आहे.इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात आढावा बैठकीत कांबळे बोलत होते.
तसेच कुटुंबाने किंवा पालकांनी भीती न बाळगता आपल्या बालकांना काही आरोग्याच्या अडचणी असतील तर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.