दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नाराजी

32

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे भारतातील लोकशाही मजबूत झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा देशातील जनतेला झाला जास्त प्रमाणात झाला आहे. कमी कालावधीमध्ये 200 प्रयोगशाळा निर्माण केल्या. भारत सर्वात मोठं लसीकरण अभियान चालवतोय, याचा अभिमान आहे. देशात आरोग्याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे.

दिल्लीत नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उल्लेख केला. राष्ट्रपतींनी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतूक करतानाच कृषी कायदे फायद्याचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

१० कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना या कृषी सुधारणांचा फायदा मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिल्याचे राष्ट्रपती म्हणाले. परंतु, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचं गंभीरपणे पालन केले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले.