संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव

21

राठोडांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार असल्याचं समजतंय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकीयांचाच दबाव वाढणार असंच दिसत आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याची भूमिका भाजपनं घेतली आहे. संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे.

विदर्भातले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.भाजपच्या दबावासोबत शिवसेनेच्या आमदार खासदारांचाही पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही म्हटलं जात आहे.

१ मार्चपासून अधिवेशन सुरु होत आहे. राठोड यांच्यामुळे अधिवेशनात गदारोळ होणार हे निश्चित आहे.विरोधकही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात आहे.