पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीतील विद्यार्थ्याला पत्र पाठवून कौतुक केलं आहे. परभणीतील वैभव नगर येथील बालविद्या मंदिर शाळेत सहाव्या वर्गात शिकणारा अजय डाके या विद्यार्थ्याचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मोदींनी या विद्यार्थ्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अजयने सहज नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. सोबतच स्वतः काढलेले नरेंद्र मोदी यांचे स्केच सुद्धा पाठवले होते. याच पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर आलं आहे. या उत्तरात स्केच आवडल्याच मोदींनी म्हटलं आहे. मोदींचे पत्र आल्याने विद्यार्थ्यांसह पालक भारावून गेले आहेत.
अजयला लहानपणी पासून चित्रकलेची आवड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्केच तयार करून सहज अजयने पंतप्रधान मोदी यांना पाठवले. पण, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत प्रतिउत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदींनी या पत्रात अजय डाके या विद्यार्थ्याच्या कलेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. ‘चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करते. या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भूत आहे’ असेही पत्रात नमूद केले आहे.