पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग केला. मोदींनी उल्लेख केलेल्या या शब्दावरुन आता जोरदार राजकारण रंगलं आहे. सर्वच विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी आणि पर्यायानं भाजपवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत जे व्यक्तव्य केलं ते पंतप्रधानपदाला शोभत नाही.कदाचित पंतप्रधान मोदी देशाची परंपरा विसरले आहेत. महात्मा गांधी यांनी अहिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनच देश स्वतंत्र केला होता, हे विसरु नका. आंदोलकांची अशी हेटाळणी करत असाल तर हे बरोबर नाही’, असं प्रत्युतर राजू शेट्टी यांनी दिलं आहे.
सर्वच विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी आणि पर्यायानं भाजपवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 76 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही आंदोलकांना मोदींनी हा टोला लगावला आहे.
75 दिवसांपेक्षा अधिक काळ शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु ठेवलं आहे. शेतकऱ्यांचे रस्ते बंद करण्यासाठी खिळे ठोकण्याचा गंभीर प्रकार केला. त्यामुळे हे सरकारच खरं देशद्रोही आहे’, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.आज ते इंदापुरात बोलत होते.