प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले आहे. सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे. सध्या सर्वांचच लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागलं आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींना सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली आहे. मोदींनी यावेळी कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.
संपूर्ण देशभरात कोरोनाची लस आणि त्याचे वितरण याबाबत तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत. पुणे, हैदराबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. झायडस कॅडिलाला भेट दिल्यानंतर मोदी म्हणाले की, आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी भरपूर कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे’ असे मोदींनी टि्वट केले आहे.
दरम्यान, यावेळी ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रधानमंत्री महोदय यांचे स्वागत केले आहे.