पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. . ते काय मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही. एक कर्तुत्ववान म्हणून, एक संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रपती केलं,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
बिहारमध्ये मुस्लीम बहुल भागात२९ पैकी १४ जागांवर भाजपला विजय मिळाला. तर मुस्लीम महिलांनीही आपल्या पतीला सांगितलं तुम्हाला जे काही करायचं ते करा आम्ही मोदींनाच मतदान करणार आहोत, असं पाटील यांनी नमूद केलं.
स्वातंत्र्य लढ्यात तरूणांचं मोठं योगदान होतं. तसंच योगदान आजही युवकांनी द्यावं. या पिढीला खरा इतिहास सांगण्याचं तसंत इतिहास, राष्ट्र आणि संस्कृतीशी जोडण्याचं काम युवा मोर्चा करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं.