ऑक्सिजन वॉरियर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ द्वारे संवाद

6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला असून, यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. 

यावेळी बोलताना त्यांनी देशात मागच्या काही दिवसांत येऊन गेल्या चक्रीवादळांबद्दलही भाष्य केलं.दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ऑक्सिजनमुळे प्रचंड हाहाकार उडाला होता. 

देशात सगळीकडे करोनाची ओरड सुरू झाल्याने सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला.