कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळुन येत आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विविध राज्यांच्या1 मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तांनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या सलग दोन बैठका होऊ शकतात.
दिल्ली आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्या आहेत. पहिल्या बैठकीत पंतप्रधान सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत लॉकडाउन संबंधित चर्चा होणार आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचा वाढता आकडा पाहता आता पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत कोरोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.
देशातील कोरोना रुगणांची संख्या दिवसाला 50 हजारापेक्षाही कमी असताना काही राज्यांमध्ये कोरोना संकट पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्ये संचारबंदी लागू केली जात आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाचं विधान केले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून 8 ते 10 दिवसात याबाबत अंदाज घेऊन लॉकडाउनबाबतचा निर्णय घेऊ, अस अजित पवारांनी म्हंटल आहे. दिवाळीत कोरोनाचा संसर्ग वाढत गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसाला 5 हजार रुग्ण सापडत आहेत त्यामुळे पवारांनी असे वक्तव्य केले आहे.