पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुद्वाराला अचानक भेट, पहा फोटो

7

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्लीमधील  गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. त्यांनी गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. हा ठरलेला दौरा नसून अचानक मोदी यांनी गुरुद्वाराला भेट दिली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटरवरील संदेशामध्ये म्हटले आहे की, ‘शहीदी दिवसानिमित्त महान श्री गुरू तेग बहादुर जी यांना नमन करत न्याय आणि समावेशक समाजाच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे स्मरण करतो’.

यावेळी वाहतुक व्यवस्था ही बंद करणात आल्या नव्हत्या. यावेळी कोणताही विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुरु तेगबहादुर यांच्या त्यागाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी यांनी सोशल मीडियावरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.